Homeआरोग्यहिंगोलीत 4.7 रिश्टरचा भूकंप; परभणीसह परिसरात सौम्य धक्के, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

हिंगोलीत 4.7 रिश्टरचा भूकंप; परभणीसह परिसरात सौम्य धक्के, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

परभणी (प्रतिनिधी प्रवीण चौधरी) : शनिवारी सकाळी सुमारे ८:४४ वाजता हिंगोली जिल्ह्यात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले. ही माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

नागरिकांनी अफवा, खोटे संदेश किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भूकंपाच्या वेळी घरात असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपऱ्यात आसरा घेऊन डोक्याचे संरक्षण करावे, तसेच धक्का थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच लिफ्टचा वापर टाळावा, विजेचे उपकरणे बंद ठेवावीत आणि कमकुवत इमारती किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके (मो. 9975013726) किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02452-226400 / टोल फ्री 1077) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!