Homeमहाराष्ट्रमहात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य आणि सामाजिक समता या मूल्यांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांची आजही समाजाला तितकीच गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली…या विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती घडवली. ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेत सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा उभारला.

३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून त्यांनी देशातील पहिली महिला शिक्षिका घडवली. तसेच वंचित व बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी सामाजिक समतेचा पाया मजबूत केला.

सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध ठोस लढा दिला. ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले.

१८८८ मध्ये त्यांना “महात्मा” ही उपाधी देण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले, मात्र त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!