क्रॉम्प्टनने नवीन मास्टर ब्रँड ओळख सादर केली; प्रीमियम उत्पादनांचा विस्तार केला

क्रॉम्प्टनने नवीन व्हिज्युअल आणि साउंड ओळख तसेच नवीन टॅगलाइन सादर केली. यासोबतच ‘क्रॉम्प्टन रिऑन’ हा सुपर-प्रीमियम ब्रँड लॉन्च केला असून ‘एनर्जियन’ ब्रँडही अधिक मजबूत करण्यात आला आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट 2026: भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आज आपली नवीन मास्टर ब्रँड ओळख सादर केली. यासोबत कंपनीच्या ‘क्रॉम्प्टन 2.0’ या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या नव्या टप्प्यात कंपनीचे लक्ष नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांवर आधारित व्यवसाय उभारण्यावर राहणार आहे.
क्रॉम्प्टनच्या नवीन ओळखीचा मुख्य भाग म्हणजे ‘सेफायर’ (Cephyr). याचा उच्चार ‘सॅफ-फायर’ असा केला जातो. हे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे नवीन चिन्ह आणि प्रमुख व्हिज्युअल ओळख आहे.‘ सेफायर’ हे नाव दोन गोष्टींपासून प्रेरित आहे. सॅफायर (Sapphire) या रत्नाच्या गडद आणि टिकाऊ निळ्या रंगापासून तसेच ग्रीक पौराणिक कथांमधील झेफायरस या सौम्य वाऱ्यापासून प्रेरित आहे. यात काळजी, गुणवत्ता, आकर्षकता आणि कायमस्वरूपीपणा यांचा अर्थ व्यक्त होतो.‘ सेफायर’ हे चिन्ह क्रॉम्प्टनच्या आधुनिक आणि आकर्षक डिझाइनकडे होणाऱ्या बदलाचे प्रतीक आहे.
सेफायर’ सोबत क्रॉम्प्टनने नवीन ब्रँड टॅगलाइन ‘अमेझिंग, एव्हरी डे.’ सादर केली आहे. ही केवळ एक टॅगलाइन नसून, रोजच्या जीवनातील साध्या गोष्टी अधिक चांगल्या, सोप्या आणि आनंददायी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याची कंपनीची बांधिलकी दर्शवते. ‘अमेझिंग म्हणजे दैनंदिन जीवनात आनंद देणारे चांगले अनुभव आणि ग्राहकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी नावीन्यपूर्ण उत्पादने. याचा अर्थ केवळ मोठ्या किंवा आकर्षक गोष्टी असा नाही, तर जीवन अधिक सोपे, आरामदायी आणि आनंददायी करणारे छोटे-छोटे बदल असा आहे. ‘एव्हरी डे म्हणजे विश्वासार्हता आणि ग्राहकांसोबत कायम राहणे. रोजच्या जीवनातील गरजांच्या वेळी क्रॉम्प्टनची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध राहतील आणि त्यांच्या जीवनात अधिक मूल्य वाढवतील, असा त्याचा अर्थ आहे
या व्हिज्युअल बदलासोबत क्रॉम्प्टनने नवीन आणि खास साउंड ओळख (सोनिक आयडेंटिटी) देखील सादर केली आहे. यामुळे ब्रँडची वेगळी आणि सहज ओळखता येणारी साउंड ओळख तयार होईल. ही साउंड ओळख जाहिराती, डिजिटल प्लॅटफॉर्म, उत्पादनांचा अनुभव आणि दुकानांमधील ग्राहकांचा अनुभव अशा विविध ठिकाणी वापरली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टन ब्रँड त्याचा आवाज ऐकूनही सहज ओळखता येईल आणि तो त्यांच्या लक्षात राहील. या नवीन साउंड ओळखीमुळे क्रॉम्प्टन ग्राहकांना दृश्य आणि ध्वनी अशा दोन्ही माध्यमांतून एकसंध, आधुनिक आणि प्रभावी ब्रँड अनुभव देऊ शकणार आहे.
प्रोमीत घोष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणाले, “घरगुती सुविधा आणि उत्पादनांच्या क्षेत्रात सध्या मोठे बदल होत आहेत. ग्राहकांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना, सहज अनुभव आणि विश्वासार्ह उत्पादने यांना महत्त्व वाढत आहे. भविष्यातील मजबूत ब्रँड केवळ एका उत्पादनाच्या श्रेणीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांची ओळख ठरेल. याच विचारातून ‘क्रॉम्प्टन 2.0’ ही आमची धोरणात्मक वाटचाल सुरू झाली आहे.
तन्मय प्रुस्टी, मुख्य विपणन अधिकारी (CMO), क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणाले, “गेल्या काही वर्षांत क्रॉम्प्टनमध्ये मोठे बदल झाले आहेत आणि आमची नवीन ब्रँड ओळख या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. व्हिज्युअल आणि साउंड ओळख यांचा समावेश असलेली ही एकसंध ब्रँड प्रणाली आहे. यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टनचा अधिक वेगळा आणि चांगला अनुभव मिळेल. त्याचबरोबर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध ग्राहकवर्गांसाठी योग्य उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या विविध ब्रँड्सचा मजबूत पाया तयार करत आहोत. क्रॉम्प्टनची नवीन मास्टर ब्रँड ओळख टप्प्याटप्प्याने कंपनीच्या विविध उत्पादनांमध्ये, पॅकेजिंगमध्ये, रिटेल स्टोअर्समध्ये, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि ग्राहकांशी होणाऱ्या संवादामध्ये लागू केली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टनच्या प्रत्येक संपर्काच्या ठिकाणी एकसंध आणि समान ब्रँड अनुभव मिळेल.