Homeमहत्त्वाचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी आझाद समाज पार्टीचे निवेदन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी आझाद समाज पार्टीचे निवेदन.

निलेश ठाकरे (महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :
चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे तात्काळ सौंदर्यीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अँड. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे यांनी हे निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर हा सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी येथे भेट देतात. मात्र सध्या या परिसराची स्थिती अत्यंत दुर्लक्षित असून स्वच्छता, सौंदर्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीने महानगरपालिकेकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये परिसराचे सुशोभीकरण करून स्वच्छता राखणे, फुलझाडे व हिरवळ विकसित करणे, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण करणे यांचा समावेश आहे. तसेच पुतळा परिसरात ग्रेनाईट किंवा मार्बल दगडांचा वापर करून आकर्षक सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी परिसर उजळून दिसावा यासाठी उच्च क्षमतेचा हायमास्ट लाईट बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देऊन निळ्या रंगातील एलईडी अक्षरांमध्ये फलक उभारण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय बाबासाहेबांच्या जीवनसंघर्ष, कार्य आणि विचारांचे दर्शन घडवणारे आकर्षक वॉल पेंटिंग व माहितीफलक उभारण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी हे सर्व काम युद्धस्तरावर पूर्ण करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. या वेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे यांचा साेबत भीम आर्मीचे महाराष्ट्र सदस्य सुरेंद्र रायपुरे, आझाद समाज पार्टीचे जिल्हा सचिव प्रणित भगत, कपिल भगत, अनिकेत शेंडे आणि गुफरान व इतर कार्यक्रत्यांची उपस्थिती होती.

या वेळेस मनपा आयुक्तांना जग बदलवणारा बाप मानुस हे पुस्तक भेट देवुन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर मागणीमुळे शहरातील आंबेडकरी समाजात समाधान व्यक्त होत असून, महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

0
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

0
दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...

error: Content is protected !!