Homeताज्या बातम्यागोपाळवाडी रोड वाहतूक कोंडीवरती गंभीर प्रश्न: महालक्ष्मी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर पार्किंगचा अडथळा...

गोपाळवाडी रोड वाहतूक कोंडीवरती गंभीर प्रश्न: महालक्ष्मी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर पार्किंगचा अडथळा…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) – दौंड शहरातील गोपाळवाडी रोड येथे प्रमुख आरोग्यसेवा केंद्र असलेल्या महालक्ष्मी हॉस्पिटल समोरील रस्त्यावर पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. रस्ता अवघ्या २० फुटांचा असूनही दोन्ही बाजूंनी बेशिस्त गाड्या उभ्या केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना व रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर खाजगी गाड्या, रिक्षा, दुचाकी तसेच एमआयडीसीच्या मोठ्या बसेस यांची अतिक्रमणासारखी गर्दी झाली आहे. काही वेळा रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणेही कठीण होऊन बसते. विशेषतः आपत्कालीन रुग्णांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.

स्थानिक रहिवासी राहुल आढाव म्हणाले, “दररोज याच मार्गावरून शाळकरी मुले, महिलावर्ग व रुग्ण ये-जा करतात. पण रस्त्यावरच उभ्या असलेल्या गाड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.”

नागरिकांची प्रमुख मागणी: या भागात ‘नो पार्किंग झोन’ घोषित करावा. वाहतूक पोलिसांनी नियमित पेट्रोलिंग करावे आणि नियम भंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात यामुळे गंभीर अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!