Homeआरोग्यगेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ कारच्या बंपरच्या एका छोट्याशा तुकड्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला माजलगाव येथून ताब्यात घेतले.

दि. २२ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बागपिपळगाव येथील उड्डाणपुलावर पायी जाणारे बाबासाहेब यशवंत मुगटराव (वय ४३) यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला होता. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना कारच्या बंपरचा एक छोटासा तुकडा मिळाला. त्या तुकड्यावर ‘अपस्ट’ असे स्टिकर आढळून आले. पोलिसांनी मायक्रोस्कोपच्या साहाय्याने त्याचा बारकाईने तपास केला असता, तो विशिष्ट मॉडेलच्या कारचा असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी विविध गॅरेज आणि ऑटोमोबाइल्सकडे चौकशी सुरू केली. तपासादरम्यान हा स्पेअर पार्ट छत्रपती संभाजीनगर येथील शोरूममधून लातूर येथील एका वाहनासाठी मागविण्यात आल्याचे समोर आले. संबंधित वाहनाचा क्रमांक मिळताच पोलिसांनी शोधमोहीम राबवून माजलगाव येथून कारसह चालकाला ताब्यात घेतले.

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके व पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अण्णासाहेब पवार, पीएसआय राम खोत, अशोक हंबर्डे आणि धीरज खांडेकर यांच्या पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.

सूक्ष्म पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या गेवराई पोलिसांच्या या ‘स्मार्ट’ तपासाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

0
दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...

पुण्यात बस चालक निलंबित! प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याने PMPML प्रशासनाची धडक कारवाई

0
विकास चव्हाण (प्रतिनिधि पुणे) :  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीची अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे....

error: Content is protected !!