Homeक्राईमचोरी करून पळ काढला, पण १२ तासांतच गजाआड जळगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

चोरी करून पळ काढला, पण १२ तासांतच गजाआड जळगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करून मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. या जलद कारवाईमुळे व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास घेतला आहे.

दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भजे गल्ली येथील प्रिन्स वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील कपाटातून सुमारे २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या राज वाईन्सचे शटर फोडून तब्बल ३ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.

एकाच रात्री दोन मोठ्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली. अथक प्रयत्नांनंतर संशयित आरोपीला अवघ्या १२ तासांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, तसेच चोरीस गेलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनाचे कौतुक केले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!