Homeमहाराष्ट्रफिनिक्स 2K26 टेक्निकल फेस्टिव्हल उत्साहात संपन्न

फिनिक्स 2K26 टेक्निकल फेस्टिव्हल उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात “फिनिक्स 2K26” हा भव्य टेक्निकल फेस्टिव्हल दिनांक 28 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोड वॉर, कॅड गुरु, फॉर्म्युला फन, बॅटल ऑफ ब्रेन्स, वेब क्राफ्ट, वेब क्राफ्ट एआय, पोस्टर प्रेझेंटेशन आणि शार्क टॅंक यांसारख्या स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर विशेष पाहुणे म्हणून एमएसईडीसीएल, जळगावचे सुप्रीटेंडिंग इंजिनीयर श्री. विनोद पाटील उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे, डॉ. तुषार कोळी, डॉ. ईश्वर जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. देवेंद्र फेगडे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, हा उपक्रम गेल्या 23 वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात असून यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. त्यांनी विद्यार्थ्यांना बहुआयामी ज्ञान आत्मसात करून अशा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

विशेष पाहुणे श्री. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सोलर इनोव्हेशन, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील संधी याबाबत माहिती दिली. तसेच डॉ. वर्षा पाटील यांनी वेळेचे योग्य नियोजन आणि स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग यावर भर दिला.

या फेस्टिव्हलमध्ये 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यासह परिसरातील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी इग्नाइट अकॅडमी, पॅशन सॉफ्टवेअर (जळगाव), किरण अकॅडमी (पुणे), सॉफ्टेड, इलेक्ट्रोसॉफ्ट आणि एम सॉफ्ट हे प्रायोजक सहभागी होणार आहेत. विजेत्यांना प्रथम पारितोषिक ₹3000, द्वितीय ₹2000 आणि तृतीय ₹1000 तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा वाघुळदे आणि रिद्धी भिरुड यांनी केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवेंद्र फेगडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!