पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचे स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.
या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्या आश्वासनानंतर अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.
यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, नेमकं चाललंय तरी काय? पुरावे समोर आल्यानंतरही कारवाई का होत नाही? दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे का? की चौकशी केवळ कागदोपत्रीच सुरू आहे?जर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले असेल, तर त्यानंतर प्रत्यक्षात कोणती पावले उचलली गेली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. यासोबतच किट देण्यासाठी आया फाउंडेशनला परवानगी कोणी दिली होती? या फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्याशी कोणी चर्चा केली होती? आया फाउंडेशन नेमके कशा प्रकारे काम करते? या प्रश्नांची उत्तरे देखील अनुत्तरीत आहेत. दरम्यान, टाईम्स ऑफ महाराष्ट्र हा विषय इथेच थांबवणार नाही. या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू राहील. या प्रकरणाशी संबंधित कोणाकडे माहिती, पुरावे किंवा तक्रार असल्यास त्यांनी टाईम्स ऑफ महाराष्ट्रशी संपर्क साधावा. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं चाललंय तरी काय?
RELATED ARTICLES
- Advertisment -
NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे
....
ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...
महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...
बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...
भंडारा येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी...