दौंड (प्रतिनिधी-मयूर साळवे संघराज गायकवाड): सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, दौंड यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्य प्रत्येकाने आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष बी. डी. गायकवाड, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय आढाव, शहराध्यक्ष गालफाडे, शहर उपाध्यक्ष भारत नगरे, भारत मुक्ती मोर्चाच्या महिला तालुकाध्यक्ष प्रमिला कातखेडे, मोरे सर, राजू थोरात, गफ्फार पानसरे, मिलिंद थोरात, विजय गायकवाड, सदाशिव रणदिवे, सुनील कांबळे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष आत्तार सर, सज्जन धिवार तसेच भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भारत मुक्ती मोर्चा, दौंड यांच्या वतीने करण्यात आले.






















