Homeताज्या बातम्यावाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ नाशिकचे योगदान मोलाचे ठरले आहे. या सभागृहामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज सभागृहाची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक सहकार्य केले. या सभागृहात विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा, पालक मेळावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करताना समाजातील संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे शैक्षणिक विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनीही या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी मदत होणार असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यांनी केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सोमनाथ वाघ यांनी करून दिला. सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन रावसाहेब आढाव यांनी केले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे उपप्रांतपाल मुरली राघवन, जेके मैनी प्रोसिजर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सीओओ कमलाकर टाक यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. गौरव सामनेरकर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!