Homeताज्या बातम्यावाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. ‘शब्बो’ नावाची सात वर्षांची शेळी गेल्या दोन वर्षांपासून दररोज तब्बल दीड ते दोन लिटर दूध देत असल्याचा दावा तिचे मालक शेख दाम्पत्य यांनी केला आहे. विशेष म्हणजे, शब्बोला गेल्या सात वर्षांपासून पिल्लू झालेले नाही. तरीही तिच्या स्तनातून नियमित दूध येत असल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
शेख दाम्पत्याच्या घरी पूर्वी सासऱ्यांनी एक शेळी भेट दिली होती. त्या शेळीने नर व मादी अशी दोन पिल्ले दिली. मात्र पिल्ले जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी त्यांच्या आईचे आजाराने निधन झाले. त्यानंतर शेख दाम्पत्याने दोन्ही पिल्लांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले.
त्यापैकी नर पिल्ले काही महिन्यांतच विकण्यात आले. मात्र मादी पिल्लू असलेल्या ‘शब्बो’शी कुटुंबाचे भावनिक नाते निर्माण झाले. मालकाच्या पत्नीने तिला मुलीप्रमाणे जपले. शब्बो घराबाहेर जात नाही, कुठेही एकटी सोडली जात नाही. घरातील सदस्य जिथे असतात, तिथेच ती असते.
पिल्लू नसतानाही दूध देण्याचा दावा
शब्बोला सात वर्षांपूर्वी पिल्लू झाले होते. त्यानंतर मात्र गेल्या सात वर्षांत तिची गर्भधारणा झालेली नसल्याचे शेख दाम्पत्य सांगतात. गर्भधारणा होण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारही करण्यात आले; मात्र त्याचा अपेक्षित फायदा झाला नाही.
मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शब्बोला पिल्लू नसतानाही नियमित दूध येत असल्याचे तिचे मालक सांगतात. सुरुवातीला दूध काढण्याचा प्रयत्न केला असता तब्बल दोन ते तीन लिटर दूध मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शब्बो दाखविण्यात आली.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध तपासून ते मानवी सेवनासाठी योग्य असल्याचा सल्ला दिल्याचे शेख दाम्पत्याचे म्हणणे आहे. त्यानंतर कुटुंबाने शब्बोच्या दुधाचा वापर सुरू केला.
रोज सकाळी दीड लिटर, संध्याकाळी अर्धा ते पाऊण लिटर दूध
शेख दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, शब्बोकडून दररोज सकाळी साधारण एक ते दीड लिटर दूध मिळते. घरात पाहुणे किंवा इतर नागरिक आले असता संध्याकाळीही अर्धा ते पाऊण लिटर दूध काढले जाते. विशेष म्हणजे, शब्बोला दूध काढताना कोणताही त्रास होत नाही.
दूध काढण्यापूर्वी तिला घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेमाने खाऊ-पिऊ घातले जाते. भाकरी, फळे, भाज्या तसेच चॉकलेट, बिस्किटे यांसारखे पदार्थही ती आवडीने खाते. घरातील लहान मुलाप्रमाणे तिची काळजी घेतली जाते.
‘आई गेल्यानंतर शब्बोला मुलीप्रमाणे जपले’
शेख दाम्पत्य सांगतात की, शब्बो केवळ शेळी नसून त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. तिच्या आईच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा दिवसांची असताना तिला मायेची ऊब देत मुलाप्रमाणे वाढवण्यात आले. त्यामुळे शब्बो आणि कुटुंबीयांमध्ये एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाले आहे.
“शब्बोला कधीही घराबाहेर एकटी जाऊ दिले नाही. ती आमच्यासोबतच राहते. आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखी तिची काळजी घेतो,” अशी भावना शेख दाम्पत्याने व्यक्त केली.
‘शब्बो’ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
शब्बोच्या दूध देण्याची बातमी परिसरात पसरल्यानंतर तिला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अनेकजण कुतूहलापोटी तिची माहिती घेण्यासाठी शेख दाम्पत्याच्या घरी येत आहेत.
निसर्गातील या अनोख्या घटनेबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असले तरी शब्बो आणि शेख दाम्पत्यातील मायेचे नाते मात्र या घटनेला वेगळाच भावनिक स्पर्श देते.
निसर्गाचा हा अनोखा चमत्कार नेमका कशामुळे घडतोय, याबाबत पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून शास्त्रीय तपासणी व स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत वाळूजच्या टेकडी गल्लीतील ‘शब्बो’ नागरिकांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)  जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची, नियमांची व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी, तसेच महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत,...

error: Content is protected !!