Homeताज्या बातम्यापोलादपूर तालुक्यात ३ लाख २५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त तीन...

पोलादपूर तालुक्यात ३ लाख २५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त तीन आरोपींविरुद्ध गुन्हा; एक आरोपी फरार

पोलादपूर रायगड जिल्हा:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर)  तालुक्यातील कापडे बुद्रुक व परिसरातील विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील भरारी पथकाने धाड टाकून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक आरोपी फरार आहे. ही कारवाई शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि रायगडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक संतोष पिसाळ, बालाजी कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेष हार्डिक, मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, सुनील धन, प्रशांत नवले, रंजीत माकोडे, महिला जवान रचना मोहिते तसेच चालक राकेश धुळे व शांतिनाथ पाटील यांनी सहभाग घेतला.

भरारी पथकाने कापडे बुद्रुक गावात छापा टाकून २४ बॉक्स विदेशी मद्य आणि १५ बॉक्स गोवा बनावटीचे देशी मद्य असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणी विकास कदम व योगेश चीनकर यांच्यासह एकूण तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक आरोपी फरार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांनी सांगितले की, “बेकायदेशीर दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कडक नजर असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

गोंदे फाट्यावरील ढाब्यावर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक–पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील ढाब्यावर सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वावी पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नानासाहेब पंडित यांची निवड

0
 गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ शाखा गेवराई तालुका ची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात...

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

error: Content is protected !!