आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्रावहिणी पवार यांच्याविषयी गरळ ओकणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहिर निषेध करत आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सपकाळांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध केला आहे. ‘हर्षवर्धन सपकाळचे करायचे काय ? खाली मुंडके वर पाय, महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहिर निषेध’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. नगराध्यक्षा प्रतिनिधी शेख मुजीब यांच्या नेतृत्वात बीड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काँग्रेस पक्षाचा तिव्र निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांनी अवमानकारक शब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गेवराई व बीड येथे हर्षवर्धन सपकाळ यांचा तिव्र निषेध करत आंदोलने केली. बीड शहरातील बशिरगंज चौक येथे आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिनिधी शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिव्र निषेध आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत उपस्थित कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. ‘ना.सुनेत्रावहिणी आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. ना.सुनेत्रावहिणी राज्याच्या सक्षम उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याने अक्कल गहाण ठेवली का ? असा प्रश्न उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, सभापती जकी सौदागर, माध्यम प्रतिनिधी भागवत तावरे, नगरसेवक जैतुल्ला खान, सादेकुजमा, महेश धांडे, शेख बिलाल, खय्युम इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नजीरचाचा, शेख इकबालभाई, संदिप पाटील, बरकत पठाण, शेख मेहराज, समीर तांबोळी, ॲड.सय्यद खाजा, सय्यद जुल्फेकार अली, सय्यद फईम, इफ्तेकारभाई, शेख तालेब, शेख युनूस, शेख पाशा, नाहेद बागवान, शेख मुन्ना, सलीम डी.के, अन्सर खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.























