Homeताज्या बातम्याचंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला खाज सुटणे आणि पुरळ उठणे यांसारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने जिल्हा आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या शासकीय सर्वेक्षणात तब्बल १९८ नागरिक विविध चर्मरोगांनी ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूरचे उप-प्रादेशिक अधिकारी सुशीलकुमार साहेबराव राठोड यांनी १६ जुलै २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने अहवाल मागवला होता. हे क्षेत्र आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १७ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे आदेश दिले. त्यानंतर १७ जुलै ते २१ जुलै २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत वैद्यकीय चमूने बाधित ५ गावे आणि २ वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन सखोल सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अधिकृत अहवाल आता समोर आला आहे.

वैद्यकीय पथकाने सादर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चर्मरोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे.

पेठ वॉर्ड: ६२ रुग्ण फुलेनगर वॉर्ड: ५८ रुग्ण उदापूर: २२ रुग्ण पराडगाव: १७ रुग्ण बोरगाव: १६ रुग्ण झिलबोडी: १६ रुग्ण परसोडी: ०७ रुग्ण

या सातही भागांतील एकूण १९८ रुग्ण सध्या विविध प्रकारच्या चर्मरोगांशी लढा देत आहेत. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. या निष्कर्षांनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. “पैशांच्या हव्यासापोटी आमच्या पिढ्या उद्ध्वस्त करणाऱ्या या इथेनॉल प्रकल्पावर तात्काळ दंडात्मक कारवाई करून तो बंद करण्यात यावा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरूपात सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू केले असून, बाधित गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता या सर्वेक्षणाच्या अधिकृत अहवालाच्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित इथेनॉल प्रकल्पावर फौजदारी गुन्हा दाखल करणार की नेहमीप्रमाणे नोटीस देऊन सोडून देणार? याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यांचे आणि ब्रह्मपुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

‘शारदा हॉस्पिटल’चा शुभारंभ व वर्धापन आज गेवराईत आधुनिक उपचारपद्धतीचा विस्तार

0
 गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, व शहर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. प्रदीप व डॉ. प्रियंका राठोड...

error: Content is protected !!