राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध
गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहीणी अजित पवार यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार सोनवणे यांना निवेदन देत संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी सभापती कुमारराव ढाकणे, मुजीब पठाण, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, विनोद सौंदरमन, नगरसेवक शेख खाजामामू, दादासाहेब घोडके, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रविंद्र बोराडे, एस. वाय. अन्सारी, दादाराव रोकडे, गोरख शिंदे, विलास सुतार, जालिंदर पिसाळ, सचिन मोटे, कृष्णा मुळे, दत्ता दाभाडे, विजय सुतार, बंटी सौंदरमल, गजानन काळे, मुक्ताराम आव्हाड, सोमनाथ गिरगे, गणेश दावडकर, सरवर पठाण, शेख बाबूभाई, संदीप मडके, प्रल्हाद शिंदे, शेख निजाम, सलमान सय्यद, सतीश प्रधान, बाळराजे सोनकांबळे, मायकल सुतार, खालेद कुरेशी, हनुमान कोकणे, अविनाश नवले, किरण आहेर, शाम रुकर, बाबासाहेब राठोड, शेख लतीफ, शेख जाफर, बाबासाहेब चव्हाण, धनसिंग पवार, सुरेश शिंदे, प्रल्हाद दाभाडे, अमोल होंडे, अक्षय पवार, इम्रान अन्सारी, मनोज धापसे, कृष्णा गळगुंडे, साईराज लोखंडे, वसीम फारुकी, मदन भुसारी, शेख सादेक, किरण दाभाडे, सुरेश खरात, रावसाहेब काळे, शेख नईम, शेख अखिल, मनोज हजारे, शेख हशमभाई, सत्तारभाई कुरेशी, अभिषेक गायकवाड, सुभाष घुंबार्डे, शेख राजू, अशोक गायकवाड, माऊली पंडित, श्रीराम आरंगडे, मोहसीन बागवान, विनोद मोरे, शेख बाबा, लक्ष्मण शिंदे, इम्रान सय्यद, नारायण पवार, विलास ठाकूर, विनोद निकम, राधेश्याम खंडागळे, वैजनाथ मासाळ, संजय खरात, करण सुतार, मोहसीन शेख, दिलीप गंगवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















