Homeताज्या बातम्याअवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आला होता. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर आता चेंबरच्या कामासाठी नव्याने केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे PWDच्या नियोजनावर तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी रस्त्यावरील चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीला व्यवस्थित बसविणे अपेक्षित होते. मात्र, चेंबरची योग्य व्यवस्था न करता त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून चेंबर शोधण्यासाठी व त्यांची पातळी रस्त्याच्या लेव्हलला आणण्यासाठी नव्याने डांबर फोडण्याचे काम सुरू आहे.

ऐन पावसाळ्यात घाईघाईने रस्ता पूर्ण करण्यात आला आणि अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा त्याच रस्त्याची तोडफोड करण्याची वेळ आली, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी चेंबरची कामे का पूर्ण करण्यात आली नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.

नुकत्याच केलेल्या रस्त्याची पुन्हा तोडफोड झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता असून, या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकाराची PWDने तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता, नियोजन आणि देखरेख यांची चौकशी करावी, तसेच रस्ता पुन्हा तोडण्याची वेळ का आली याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!