Homeताज्या बातम्याजळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दीड लाखांचा ८ किलो...

जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दीड लाखांचा ८ किलो गांजा जप्त…

जळगाव: रेल्वे सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत मोठी कारवाई करत जळगाव रेल्वेस्थानकावर गांजाची तस्करी उघडकीस आणली. यावेळी सुमारे ८ किलो वजनाचा, अंदाजे दीड लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जळगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर घडली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या जवळील काळ्या बॅगेतून गांजासारखा वास येत असल्याचे आढळले. तपासणी दरम्यान त्याने बॅगमध्ये गांजा असल्याचे मान्य केले.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

तपासात त्याचे नाव झबिउल्ला समिउल्ला (वय २७, रा. टँक मोहल्ला, मोदी रोड, बेंगळुरू, कर्नाटक) असे असल्याचे निष्पन्न झाले. तो बेंगळुरूला गांजा घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात सहभागी दुसरा संशयित भीमसिंह मालसिंग बारेला (वय ४२, रा. कुंड्यापाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर सहायक सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास व कारवाई केली.

कारवाईचे नेतृत्व आणि पथक

ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त आणि सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात उपनिरीक्षक प्रफुल्ल खर्चे, हेड कॉन्स्टेबल सुशील मराठे, गोपाल जाधव, कॉन्स्टेबल मनोज मौर्य आणि पंकज वाघ यांचा समावेश होता.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली असून, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!