Homeताज्या बातम्यापुणे कचरा संकट : कोथरूड कचरा डेपोची जागा मेट्रोलाच, कचरा व्यवस्थापनाचा गंभीर...

पुणे कचरा संकट : कोथरूड कचरा डेपोची जागा मेट्रोलाच, कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा…

पुणे – कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे चार एकर जागा महापालिकेने महामेट्रोला दिल्यामुळे कोथरूड, वारजे आणि कर्वेनगर परिसरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या प्रकल्पांचे काम ठप्प झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासन आधीच कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरत असल्याचे चित्र असताना, या जागेच्या हस्तांतरणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ‘स्वच्छ पुणे – सुंदर पुणे’चा नारा देत भिंती रंगविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात शहराची स्थिती ‘अस्वच्छ पुणे – कुरूप पुणे’ अशी झाली आहे, अशी तीव्र टीका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, हडपसरमधील २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेल्या तीन आठवड्यांपासून बंद आहे. तसेच धायरीतील ५० टन सुक्या कचऱ्यावरील प्रकल्पात आग लागल्याने तोही गेल्या महिनाभरापासून बंद आहे. परिणामी, दररोज २५० टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

पवसामुळे ओल्या कचऱ्याचे प्रमाण वाढत असून, संकलन, हस्तांतरण आणि प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोथरूड डेपो बंद झाल्याने, या भागातून येणाऱ्या १२५ कचरा गाड्यांना औंध, घोले रस्ता आणि कात्रज येथील केंद्रांवर पाठवावे लागत आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढत असून, परिसरात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत.

या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही जागा तात्पुरती परत मागितली. त्यानुसार चार महिन्यांसाठी ही जागा पुन्हा महापालिकेला वापरासाठी देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, हडपसरमधील प्रकल्प देखभाल दुरुस्तीसाठी बंद असून तो आठ दिवसांत पुन्हा सुरू होईल. तसेच कोथरूडमधील जागा २०१८ मध्येच महामेट्रोला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत चार महिन्यांसाठी तेथील ‘रॅम्प’ पुन्हा सुरू ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!