Homeताज्या बातम्यानागपूर-सावनेर: २४ तासात तीन अपघात, दोन मृत्यू – महामार्गावर मृत्यूचे सत्र कायम

नागपूर-सावनेर: २४ तासात तीन अपघात, दोन मृत्यू – महामार्गावर मृत्यूचे सत्र कायम

नागपूर-सावनेर: – सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २४ तासात वेगवेगळ्या तीन अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहिली घटना सावनेर-नागपूर रोडवरील मानेगाव शिवारात शुक्रवारी घडली. नागपूरवरून भरधाव येणाऱ्या एमएच ४९ बी आर ८७२९ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मन्साराम कुंभरे (वय ५०, रा. मानेगाव) गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नागपूर येथील मेडिकल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना सावनेर-कळमेश्वर मार्गावर बोरगाव शिवारात घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला अॅक्टिवा वाहनाची धडक बसली. या अपघातात अॅक्टिवा चालवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below 👆👆

तिसऱ्या अपघातात मंगळवारी सायंकाळी ११ वाजताच्या सुमारास पांढुर्णा मार्गावर पेटी शिवारात कंटेनर (एमएच ४०/एके ४७५६) वळण घेत असताना फळांनी भरलेल्या पिकअप वाहनाने कंटेनरला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन उलटून त्याचा केबिनचा भाग अक्षरशः चुरडून गेला. या अपघातात पिकअपचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. जखमींची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

या तीनही घटनांमुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी अपघातांबाबत चौकशी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!