Homeताज्या बातम्याआकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचा सर्वांत मोठा आणि बहुप्रतिक्षित "अँथे" २०२४ शिष्यवृत्ती कार्यक्रम दाखल...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचा सर्वांत मोठा आणि बहुप्रतिक्षित “अँथे” २०२४ शिष्यवृत्ती कार्यक्रम दाखल…

या उपक्रमाला १५ गौरवशाली वर्षे पूर्ण, सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती आणि रोख बक्षीसे
पुणे :- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि. ने (AESL)आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम (ANTHE) या आपल्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची १५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून, या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केली आहे. ही लोकप्रिय आणि सर्वाधिक मागणी असलेली परीक्षा इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कारांसह शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी देते आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमधील त्यांच्या यशस्वी करिअरची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करते.
या वर्षी, यात एक वैशिष्ट्यपूर्ण बक्षीसाचाही समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरच्या पाच दिवसांची सहल मोफक मिळणार आहे. फ्लोरिडा येथे असलेले जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटर हे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) अमेरिकेतील दहा फील्ड केंद्रांपैकी एक आहे.
ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा होईल. याद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, राज्य सीईटीसह एनटीएसई, ऑलिम्पियाड यांसारख्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि. चे (AESL)सीईओ आणि एमडी  दीपक मेहरोत्रा म्हणाले, “असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि क्षमतांमधील अंतर भरून काढण्यात आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या शिष्यवृत्ती उपक्रमाने यशस्वी १५ वर्षे पूर्ण केली असून, आम्ही आमचे अभ्यासक्रम देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेशयोग्य बनवण्यासाठी तयार केले आहेत. आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम विद्यार्थ्यांना नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षांची तयारी त्यांच्या स्वत:च्या गतीने करण्यास सक्षम करते. ते घरबसल्याही तयारी करू शकतात. आम्हाला यंदाच्या या उपक्रमात मोठ्या सहभागाची अपेक्षा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित आहोत.”
आपली १५ वर्षांची उत्कृष्ट वाटचाल साजरी करताना,  या उपक्रमाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे पालनपोषण करण्याचा विक्रम केला आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नीट युजी आणि जेईई-अॅडव्हान्समधील अव्वल क्रमांकांसह अनेक महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  या शिष्यवृ्त्तीद्वारे आकाशमध्ये नावनोंदणी करून अव्वल क्रमांक मिळविणारे काही विद्यार्थी आहेत. यात ऋषी शेखर शुक्ला (JEE Advanced 2024 AIR 25); कृष्णा साई शिशिर (JEE Advanced 2024 AIR 67); अभिषेक जैन (JEE Advanced 2024 AIR 78) तर, नीट २०२३ मध्ये  कौस्तव बौरी (AIR 03); ध्रुव अडवाणी (AIR 05); सूर्य सिद्धार्थ एन (AIR 06); आदित्य नीरजे (AIR 27) आणि आकाश गुप्ता (AIR 28) यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
देशभरात १९ ते २७ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा
ANTHE २०२४ परीक्षा भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १९-१७ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहे. यातील उत्कृ्ष्ट विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंतच्या शिष्यवृत्ती व्यतिरिक्त रोख पुरस्कारदेखील मिळतील.
आकाशच्या देशभरातील सर्व केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा:
 आकाश संस्थेच्या देशभरातील सर्व  ३१५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइन परीक्षा होणार आहेत, तर ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत केव्हाही देता येतील. यासाठी विद्यार्थी त्यांच्या सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात.
 ही एक तासाची चाचणी असेल ज्यामध्ये एकूण ९० गुण असतील. विद्यार्थ्यांच्या ग्रेड आणि कल यावर आधारित ४० एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न असतील. इयत्ता सातवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांचा समावेश असेल. वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता, तर त्याच वर्गातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, नीटचे उद्दिष्ट असलेल्या इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यावरील प्रश्न असतील, तर अभियांत्रिकी इच्छुकांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यावरील प्रश्न असतील.
या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ऑनलाइन परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेच्या सात दिवस आधी आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षेसाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आहे. १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल.
या परीक्षेचे निकाल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ नोव्हेंबर रोजी, , इयत्ता सातवी ते नववीचा निकाल १३ नोव्हेंबर रोजी आणि  इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील. निकाल  anthe.aakash.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि.बद्दल (AESL) ः
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ही प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षा आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई यासह एनटीएसई आणि ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि प्रभावी तयारी करण्यासाठी मार्गदर्शन सेवा प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कंपनीची देशभरात ३१५ हून अधिक केंद्रे असून सध्या चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कंपनीने गेल्या ३५ वर्षांमध्ये या क्षेत्रातील आघाडीचे स्थान आणि सर्वोत्तम ब्रँड मूल्य प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या खऱ्या क्षमतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी उच्च दर्जाची चाचणी तयारी सेवा प्रदान करण्यासाठी ती वचनबद्ध आहे.
प्रत्येक विद्यार्थी अद्वितीय आहे आणि त्याच्या वैयक्तिक गरजा, क्षमता वेगळ्या आहेत हे ओळखून आकाश चाचणीच्या तयारीसाठी विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन घेते. यात उच्च पात्र आणि अनुभवी शिक्षकांची एक तुकडी आहे जी विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साध्य करण्यात मदत करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेसाठी चांगली तयारी केली आहे याची खात्री करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचे साह्य घेतले जाते. कंपनीचे उपक्रम बदलांना सहज सामावून घेऊ शकतील, अशा प्रकारे डिझाइन केले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!