Homeताज्या बातम्यालोकशाही सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा महत्वाची ; डॉ. जयप्रकाश नारायण यांचे मत...

लोकशाही सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा महत्वाची ; डॉ. जयप्रकाश नारायण यांचे मत ; एमआयटीत डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न…

लोकशाही सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा महत्वाची ; डॉ. जयप्रकाश नारायण यांचे मत ; एमआयटीत डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न…

पुणे 28 जुलै : “लोकशाहीला सशक्तीसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रप्रगतीसाठी मानव सेवा हा महत्वाचा घटक आहे. ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रशासकीय सेवेत खूप काही करण्यासारखे आहे. त्याच प्रमाणे नव्या पिढीसाठी देशात गुणवत्तापूर्ण उत्तम दर्जाचे शिक्षण आणावे.” असे मत लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट, पुणेतर्फे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा२०२३ मध्ये यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, डॉ. के. गिरीसन आणि प्रा.परिमल माया सुधाकर उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातून द्वितीय आलेले अनिमेष प्रधान यांना ७५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच बरोबर १६० यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले,” सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज आणि देशाच्या विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करताना परिश्रमावर विश्वास ठेवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. लोकसेवेसाठी जास्तित जास्त वेळ देणे गरजेचे आहे. आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल. मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे. ”
डॉ.डी.पी अग्रवाल म्हणाले,” नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपला हेतू कधीही विसरू नका. प्रत्येक सेवमध्ये प्रचंड आव्हाने आहेत. आपण लोकांच्या जीवनात बदल आणत आहोत. या क्षेत्रात राहूण आव्हानांचा सामना करावा. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवूण त्यावर अंमलबजावणी करावी. प्रामाणिकता आणि पारदर्शकतेने कार्य केल्यास देशाचा विकास होईल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”करियर आणि जीवनाचे तत्वाज्ञान हे वेगवेगळे असते. त्याचे संतुलन ठेवून आपल्या जीवनाची प्रगती करावी. जीवनामध्ये शिस्त आणि चारित्र्य महत्वाचे असते. मानवता आणि सहिष्णूता हा संदेश लक्षात ठेऊन प्रशासकीय कार्य करावे. जगामध्ये विश्वशांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य आपल्या खांद्यावर आहे.”
राहुल कराड म्हणाले, “समाजात जागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.  समाज परिर्वनात शिक्षण व्यवस्था सर्वोत्कृष्ट भूमिका पार करू शकते. डब्ल्यूपीयूमध्ये पारदर्शकता असून येथे शिक्षणाबरोबरच सामाजिकतेला महत्व दिले आहे. देशातील राजकारणात शिक्षित लोक आले तर लोकशाही सशक्त होईल. त्यामुळेच वर्तमानकाळात सर्वांना वसाहतवादी मानसिकता बदल्यण्याची गरज आहे.”  
अनिमेष प्रधान म्हणाला,”आपल्याला काय करावयाचे आहे प्रथम ठरवा. त्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा धागा पकडून आपली सेवा दयावी. देशाला प्रगतीपथावर नेतांना आपली सेवा बहुमूल्य असून यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे.”  
डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!