जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या उर्वरित अनुदानाच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सिंचन विहीर मंजूर झाली होती. विहिरीच्या कामासाठी मंजूर असलेले उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी संशयित सागर नावकर याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत संशयिताने अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी २२ जून २०२६ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल
RELATED ARTICLES
- Advertisment -
जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...
के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...
नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...
पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...
दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...