Homeताज्या बातम्याके.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, मैत्री आणि उत्कृष्टतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री या होत्या. यावेळी उपप्राचार्य विवेक पाटील, समन्वयक सागर वाघ तसेच क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक विजेंद्र जाधव, नूर तेली, दीपक पवार, नयना माळी, हेमंत शिरसाठ, संजय मोते, भरत मराठे आणि कल्पेश माळी हे उपस्थित होते.
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये धावणे, रिले रेस, खो-खो, कबड्डी तसेच इतर मैदानी खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडा कौशल्ये प्रदर्शित केली. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धात्मकता, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा विकास होण्यास मदत झाली.
यावेळी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक चळवळीचा इतिहास, ऑलिम्पिकची मूल्ये आणि जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “वेगवान, उच्च आणि अधिक मजबूत – एकत्रितपणे” हा ऑलिम्पिकचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जागतिक ऑलिम्पिक दिनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेच्या क्रीडा विभागाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!