Homeताज्या बातम्यापुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कुरेशी समाजाच्या रोजगारावर आणि आर्थिक उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, समाजाकडून या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे छावणी बोर्डाच्या अखत्यारीतील स्लॉटर हाऊसच्या संचालनासाठी Asian Meem Foods Private Limited या कंपनीची निवड करण्यात आली असून, सध्या कंपनीची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. ही निवड निविदा (टेंडर) प्रक्रियेद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे छावणी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खासगीकरण प्रक्रियेसाठी बोर्डाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी भाजप आमदार सुनील कांबळे याना या प्रक्रियेची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे निवड झालेल्या कंपनीबाबत समोर आलेले आरोप. टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, Asian Meem Foods Private Limited आणि तिच्या संचालकाशी संबंधित काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात ५७ हजार किलो गोमांस तस्करी, कथित बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर गंभीर आरोपांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्याविरोधात कारवाई सुरू असून, ते सध्या फरार असल्याची माहितीही समोर येत आहे. संबंधित प्रकरणात ८ मे २०२५ रोजी जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता.

या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर कंपनीविरोधात आणि तिच्या संचालकांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर निविदा प्रक्रियेदरम्यान या बाबींची पडताळणी करण्यात आली होती का? तसेच अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या कंपनीची निवड नेमक्या कोणत्या निकषांवर करण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे, कुरेशी समाजातील अनेकांनी खासगीकरणामुळे पारंपरिक व्यवसायावर परिणाम होईल आणि आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

हा भाग एक आहे. या प्रकरणातील संपूर्ण सत्य, निविदा प्रक्रियेतील तपशील, संबंधित कंपनीची पार्श्वभूमी आणि प्रशासनाची भूमिका याबाबत टाईम्स ऑफ महाराष्ट्र पुढील भागांमध्ये मोठे गौप्य्स्पोट आणि कागदपत्रांसह सविस्तर खुलासे करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

error: Content is protected !!