Homeताज्या बातम्या'अल्ताफ दादासाहेब शेख' यांचे 'लोरी' या हिंदी सिनेमातून संगीत दिग्दर्शनात पदार्पण...

‘अल्ताफ दादासाहेब शेख’ यांचे ‘लोरी’ या हिंदी सिनेमातून संगीत दिग्दर्शनात पदार्पण…

अल्ताफ दादासाहेब शेख’ यांचे ‘लोरी’ या हिंदी सिनेमातून संगीत दिग्दर्शनात पदार्पण…

पुणे :-  आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी लेखन,दिग्दर्शन आणि गीत लेखन करणारे अल्ताफ शेख आता ‘लोरी’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शकाच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. या सिनेमाला त्यांनी केवळ संगीत दिले नसून गीतकार देखील तेच आहेत. संगीत दिग्दर्शनात त्यांना सुधीर कुमार हजेरी यांची मोलाची साथ।लाभली आहे. सुरेश वाडकर, उर्मिला धनगर, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड यासारख्या दिग्गज गायक, गायिकांनी स्वरबद्ध केले आहे.
अल्ताफ दादासाहेब शेख, यांच्या २०१८ साली बॉक्स ऑफीसवर भरघोस कमाई केलेल्या ‘वेडा बी.एफ.’ या मराठी सिनेमातील ‘दुर्वेश बाबा’ हे सुप्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी गायलेलं गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं आणि त्यामुळेच या गाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती. या गाण्याची लोकप्रियता पाहुनच ‘लोरी’ चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर आणि दिग्दर्शक राजू रेवणकर यांनी अल्ताफ शेख यांना संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र होत, शेख यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे.
साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड’ची प्रस्तुती असलेल्या ‘लोरी’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. चारही गाणी वेगवेगळ्या धाटणीची आहेत. अर्थात शीर्षक लोरी असल्याने यात एक लोरी गीत आहे, प्रेम गीत आहे, आईची ममता दर्शवणारे एक भावनिक गीत आहे आणि एक जल्लोष गीत आहे. असे चार वेगवेगळ्या प्रकारचे गाणी करताना स्थळ, काळ, वेळ, भूमिका या सगळ्यांचाच विचार करावा लागला असल्याचे मत अल्ताफ शेख यांनी व्यक्त केले, ते पुढे सांगतात की या सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुरेश वाडकर यांना गाणे रेकॉर्ड करताना स्व.मोहम्मत रफी साहेबांच्या गायन शैलीची आठवण झाली होती.
हिंदी आणि मराठी कलाकारांचा मेळ घातलेल्या या सिनेमाची गोष्ट ही आई आणि मुलीच्या प्रेमाची, संघर्षाची आहे. महिला प्रेक्षक वर्गासह पुरुष प्रेक्षकांना देखील हा सिनेमा आकर्षित करेल यात शंका नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!