Homeताज्या बातम्यादीर्घ लढ्यानंतर २०१६ चा पिक विमा शेतकऱ्यांना

दीर्घ लढ्यानंतर २०१६ चा पिक विमा शेतकऱ्यांना

गेवराई तालुका  प्रतिनिधी:(विष्णू गायकवाड)
१५६ शेतकऱ्यांना ७२.९४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली
गेवराई, दि.३१ (प्रतिनिधी) ः- उमापूर महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी सन २०१६ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळत नसल्या प्रकरणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी वेगवेगळ्या पातळीवर पाठपुरावा केला. उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेत न्यायालयाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे आदेश पारीत केले, मात्र बँक आणि विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात हे आदेश आव्हानीत केले माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडल्यामुळे बँक आणि विमा कंपनीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी अमरसिंह पंडित यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात बँकेविरोधात अवमान याचिका दाखल केली.माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दि.३१ मार्च रोजी उमापूर महसुल मंडळातील १५६ शेतकऱ्यांना ७२.९४ लाख रुपये नुकसान भरपाई अदा झाली आहे. मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या यशामुळे अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सन २०१६ च्या खरीप हंगामासाठी उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत ४९.२२ लाख रुपये विमा हप्ता भरूनही केवळ बँक कर्मचाऱ्याच्या चुकीच्या नोंदीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विषयी अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत आवाज उठविला, सभागृहातील आश्वासना नंतर बँक, विमा कंपनी आणि शासन प्रतिनिधी यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या मात्र त्यातून मार्ग निघाला नाही. शेवटी अमरसिंह पंडित यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल केली. न्यायालयाने ७ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बँकेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली नाही.

न्यायालयाने दिलेली मुदत पूर्ण होण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. अमरसिंह पंडित यांनी ॲड.दिलीप तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात खंबीरपणे मांडली, सर्वोच्च न्यायालयाने बँक आणि विमा कंपनी यांची याचिका फेटाळून लावली. दरम्यान बँकेने पुन्हा उच्च न्यायालयात पुर्ननिरीक्षण याचिका दाखल करून वेळकाढूपणा केला.
अमरसिंह पंडित यांनी शेवटी उच्च न्यायालयात बँकेविरोधात अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणात सुनावणी सुरु असताना पिक विमा कंपनीने विमा हप्त्याची रक्कम व्याजासह बँकेला अदा केली आणि मंगळवार, दि.३१ मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेने या प्रकरणातील १५६ शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजासह पिक विमा नुकसान भरपाई पोटी ७२ लाख ९४ हजार ४९९ रुपये वाटप केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत. सिनिअर काऊन्सिल ॲड.नंदकुमार खंदारे आणि ॲड.विलास सावंत यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली आहे.चौकट
उर्वरित शेतकऱ्यांनाही न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

बँक आणि विमा कंपनी सातत्याने या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहेत, उमापूरच्या शाखा व्यवस्थापकांनी न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात अतिशय चुकीची माहिती दिली आहे. १५६२ शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरणा केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व्याजासह सुमारे ५ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी पहिल्यापासून आपली भुमिका होती. आज १५६ शेतकऱ्यांना सुमारे ७३ लाख रुपये मिळाले आहेत याचे समाधान असून उर्वरित शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

0
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

0
दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...

error: Content is protected !!