Homeताज्या बातम्यासाताऱ्यातील 11 अधिकाऱयांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर...

साताऱ्यातील 11 अधिकाऱयांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर…

साताऱ्यातील ११ अधिकाऱयांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर…

सातारा : राज्य पोलीस दलात उल्लेखनीय तसेच विशेष कामगिरी करणाऱया साताऱयातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ (डीजी मेडल) जाहीर झाले आहे. दि. १ मे रोजी हे पदक प्रदान केले जाणार आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, सहायक फौजदार संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत शिंदे, श्रीधर ठोंबरे, नंदकुमार महाडिक, पोलीस हवालदार महादेव घाडगे, विनोद राजे, पोलीस शिपाई विपीन ढवळे, मंगेश जाधव यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर झाले आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती सध्या पंढरपूर येथे आहे. सातारा तालुका पोलीस ठाणे, पुसेगाव याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक असताना पोलीस ठाण्यांना भौतिक गरजा चांगल्या पुरवून, त्या आयएसओ मानांकित करण्यासाठी व त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर सध्या सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी असून, या अगोदर त्यांनी जिल्हा विशेष शाखा, सांगली तसेच सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सातारा येथे सेवा बजावली आहे.

हवालदार विनोद राजे यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले आहे. सध्या सातारा पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या ‘उंच भरारी’ या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पोलीस शिपाई विपीन ढवळे हे सध्या महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. ते ऍथलेटिकपटू असून, अनेक सुवर्णपदके त्यांनी सातारा पोलीस दलाला मिळवून दिली आहेत. पोलीस दलात असतानाही आरोग्य निरोगी ठेवत धावण्यासोबतच शरीरसौष्ठव स्पर्धेतही ते सहभागी होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे ) :  गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच...

भक्तिमय वातावरणात गेवराईत श्रीमद् भागवत कथेला उत्साहात प्रारंभ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  समाजात वाढत्या तणाव, असंतोष आणि मानसिक क्लेशाच्या पार्श्वभूमीवर आत्मिक शांती व आध्यात्मिक शक्तीची गरज अधिक जाणवत आहे. अशा वेळी...

निफाडजवळ भीषण अपघात; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्क्याने आजीचाही अंत- चांदोरीत शोककळा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड–नाशिक–संभाजीनगर महामार्गावर पिंपळसजवळ घडलेल्या भीषण अपघातात आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा तीव्र...

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

error: Content is protected !!