Homeताज्या बातम्यामोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद...

मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद…

पुणे : जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी पुण्यात सभा घेणार आहे. शहरातील रेसकोर्स मैदानावर ही सभा होणार आहे.

या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींची पुण्यातील सभा गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.

या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ३५ हजार लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी पुण्यातील रस्ते वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्प, शहरातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात मोदींनी दोन वेळा दौरे केले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर येत आहेत.

मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील.

बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

पुणेकरांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रस्ता जंक्शन येथून इच्छित स्थळी.

खालील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)

गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता)

पुणेकरांना पर्यायी मार्ग दिले आहेत त्याच आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

अन्न व औषध प्रशासनाचा पोलिसांसह छापा; खर्रा मशीनसह ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त.!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ): राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या वडसा रोडवरील 'धनेश पान सेंटर'वर अन्न व औषध...

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

error: Content is protected !!