Homeताज्या बातम्यामुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एकूण २ कोटी २४ लाख ६४ हजार ५७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना किरण चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. तपासाचा धागा जळगावातील त्यांच्या विष्णूनगर परिसरातील निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर एसीबीच्या विशेष पथकाने शोधमोहीम राबवली.

झडतीदरम्यान घरातील विविध कपाटे, लॉकर तसेच इतर ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत झाल्या. सुरुवातीला घर सीलबंद करण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर पहाटेच्या सुमारास मागील दरवाजातून घरात प्रवेश करून काही साहित्य बाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. एसीबी अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

यानंतर चौधरी यांच्या पत्नीच्या उपस्थितीत पुन्हा सविस्तर झडती घेण्यात आली. या कारवाईत १ कोटी ५३ लाख ५४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, सुमारे ८२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ६० लाख ७७ हजार १२५ रुपये), मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, ३१ हजार ४१६ रुपयांची चांदी, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोन्याच्या खरेदी पावत्या तसेच ६ लाख २१ हजार ५४५ रुपयांच्या इतर मौल्यवान घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या.

एसीबीकडून आता चौधरी यांच्या मालमत्तेचा स्रोत, आर्थिक व्यवहार, संभाव्य बेकायदेशीर संपत्ती तसेच संबंधित व्यक्तींशी असलेले आर्थिक संबंध यांचा बारकाईने तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

वन विभागात खळबळ! १०९ कोटींच्या वृक्षलागवड घोटाळ्याची CBI चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्षलागवडीच्या नावाखाली तब्बल १०९ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याचे...

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन; कठोर कारवाईची मागणी.

0
बबनराव नागरे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा : सोशल मीडियावर नाझिया इलाही खान यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ...

कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय निकमची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड.

0
शिरपूर, धुळे :(प्रतिनिधी)तुषार शेटे कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय शामकांत निकम (वय २१) याची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे...

error: Content is protected !!