Homeताज्या बातम्यानवी मुंबईत २७ वर्षीय तरुणीची हत्या...

नवी मुंबईत २७ वर्षीय तरुणीची हत्या…

नवी मुंबईत २७ वर्षीय तरुणीची हत्या…

नवी मुंबई : नवी मुंबईत दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय पूनम क्षीरसागर नावाच्या तरुणीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चाँद नावाच्या मुलासोबत ती बेपत्ता झाली होती.

मानखुर्दमधील साठेनगरमध्ये राहणाऱ्या पूनमची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमधून टाकला होता. आता तिची हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

पूनम क्षीरसागर ही दहा दिवसांपूर्वी निजाम नावाच्या मुलासोबत बेपत्ता झालेली होती. दहा दिवसानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या निर्घृण हत्येनंतर स्थानिक हिंदू समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. – मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन. तसेच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले, मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गुरुवारी सकाळी उरणमध्ये पूनमचा मृतदेह कुजलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. आई आणि भावाने मृतदेह ओळखला. तिच्या केसांना असलेली क्लीप, दोन बोटांमधली अंगठी आणि कपड्यांसोबत एक बांगडी यावरून तिची ओळख पटवण्यात आली. डाव्या हातावर एस तर दुसऱ्या हातावर सूरज असा टॅटू होता.

वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, ओळख पटल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. तेव्हा तरुणी चार वर्षांपासून नागपाडा इथं एका टॅक्सी चालकासोबत रिलेशनमध्ये होती असं समोर आलं. याबाबत कुटुंबियांना माहिती नव्हती. पोलिसांनी २८ वर्षीय निजामुद्दीन अलीला मानखुर्दमधून आटक केलीय. त्याने चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. सँडहर्स्ट रोडवर घरकाम करणारी पूनम १८ एप्रिलला कामासाठी घरातून निघाली पण ती परतलीच नव्हती. तिच्या कुटुंबियांनी पूनम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी; संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हजारो कबरींची तयारी

0
तेहरान | वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो नागरिक तेहरानमध्ये दाखल होत असल्याने प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा आणि आपत्कालीन...

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

error: Content is protected !!