Homeताज्या बातम्यानशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक...

नशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक…

पुणे : नशेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून खून केल्याची घटना ओतूर येथील कांदा मार्केटमध्ये शनिवारी (दि.८) घडली होती. ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवाब अहमद शेख (वय ७२, सध्या रा. ओतूर ता. जुन्नर)असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. विलास बाबा वाघ (वय २०), प्रकाश बाबा वाघ (वय १९), भीमा गणेश हिलम (वय २५, तिघे रा. कन्या शाळेजवळ, ओतूर ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शेख यांचा मुलगा शादाब नवाब शेख (वय ४२, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नबाब शेख ओतूरमधील कांदा बाजारात मजुरी करायचे. शनिवारी शेख ओतूर कांदा बाजारात मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तेव्हा त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने व ओतूर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तपास सुरू केला. ओतूर बाजार आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. शेख यांचा खून होण्यापूर्वी बाजार आवारात सातजण संशयास्पद फिरत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पोलिसांनी तपास करून आरोपी वाघ, हिलम यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. नशा करण्यासाठी त्यांनी शेख यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून चोरी केलेले दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यात आयपीसी ३९६, १२०(ब) कलम वाढवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!