Homeताज्या बातम्यामुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार...

मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार…

पुणे : महापालिकेतून थेट संसदेत पाेहाेचलेल्या मुरलीधर माेहाेळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. आज (११ जून) मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला.

पदभार स्विकारण्याअगोदर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला आणखी धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली माेहाेळ यांना सहकार राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचे नेतृत्व उदयास आणले आहे.

याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे काम करणारे खाते म्हणजे सहकार खाते आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला त्या खात्याची माहिती आहे. मला देशातील शेतकऱ्यांसाठी काम करायची संधी आहे. नवी मुंबईमधील विमानतळ, पुणे विमानतळ यासाठी मला काम करता येईल.

नवीन विमानतळ टर्मिनल मार्गी लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मुरलीधर माेहाेळ यांना नागरी उड्डयन व सहकार खाते देण्यात आले. त्यामुळे पुण्यातील विमानतळ तसेच सहकार खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप येथून वाहतूक सुरू झालेली नाही. यातील अडचणींवर लक्ष घालून नवीन टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पात लक्ष घालावे, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!