Homeताज्या बातम्यावन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गणवेश व पदनामांच्या नियमांना केराची टोपली; एका वनपालाने तर...

वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गणवेश व पदनामांच्या नियमांना केराची टोपली; एका वनपालाने तर केली हद्दच पार? वरिष्ठांकडूनही सर्रास दुर्लक्ष…

वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गणवेश व पदनामांच्या नियमांना केराची टोपली; एका वनपालाने तर केली हद्दच पार? वरिष्ठांकडूनही सर्रास दुर्लक्ष…

पुणे – राज्यातील वन विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी ठरावीक गणवेश परिधान करण्याच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पदानुसार ठरवून दिलेला अधिकृत गणवेश परिधान करणे कायद्याने बंधनकारक असतानाही, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र शासनाने १९७९ मधील महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम तसेच वन विभागाच्या ४५ पानी परिपत्रकाच्या आधारे वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल अशा प्रत्येक पदासाठी गणवेशाची अचूक रचना ठरवून दिली आहे. तथापि, काही कर्मचारी स्वतःच्या मर्जीने गणवेशात बदल करतात, चुकीच्या रंगाची कॅप, बेल्ट, बूट वापरतात किंवा ज्यांना परवानगी नाही असे स्टार लावून फिरतात. काही वनरक्षक एका स्टारचा वापर करताना दिसत आहेत, तर काही वनपाल अधिक स्टार परिधान करून अधिकारपदाचा भास निर्माण करतात.

विशेष म्हणजे, या बाबीवर उच्चपदस्थ अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. नागपूरमधील विभागीय कार्यालयाकडून ४५ पाने असलेली मार्गदर्शक पुस्तिका जारी करून गणवेशाचे नियम स्पष्ट करण्यात आले असूनही, त्यांच्या अंमलबजावणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याचे दिसते.

दरम्यान, या प्रकारात आणखी एक गंभीर बाब पुढे आली आहे. एका वनपाल पदावर कार्यरत असलेले सचिन सकपाळ नावाचे कर्मचारी यांनी स्वतःचीच नवीन पदनिर्मिती करत, आपल्या नेमप्लेटवर “वन परिमंडळ अधिकारी” असे पदनाम लावले असल्याचे फोटो समोर आले आहे.

तसेच त्यांच्या व्हॉट्सअँप वरही नवीनच पद लिहिलेला आहे राऊंड फॉरेस्ट ऑफिसर तसेच यात स्पष्ट दिसत आहे की यांनी पी कॅप देखील परिधान केले आहे. यामध्ये देखील या प्रकारामुळे केवळ शासन नियमांचे उल्लंघन होत नाही, तर जनतेत दिशाभूल व गोंधळही निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा सर्रास प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अधिकाऱ्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

स्रोतांच्या माहितीनुसार, काही खासगी कार्यक्रमांमध्ये केवळ वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी अतिरिक्त स्टार वाटप केले जात असल्याचेही उघड झाले आहे. ठरावीक कालावधी पूर्ण न करताच ज्यांना स्टार मिळणे शक्य नाही, अशांनाही स्टार वितरित केले जात आहेत, असा आरोप होत आहे.

वन विभागाच्या कडक नियमांनुसार, अधिकारी किंवा कर्मचारी केवळ स्वतःच्या पदानुसारच गणवेश व अधिकृत पदनाम वापरू शकतो. कोणताही बदल किंवा चुकीचा वापर हा फौजदारी गुन्हा मानला जातो आणि यासंदर्भात कारवाईस पात्र ठरतो. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आता जोर धरत आहे. अन्यथा या प्रकारांमुळे विभागातील कार्यपद्धतीबद्दल समाजात चुकीचा संदेश जातो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणावर मुख्य वनरक्षक काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रमश :

भाग १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा...

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

error: Content is protected !!