Homeताज्या बातम्यागोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासह रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत...

गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासह रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत…

गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासह रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत…

मुंबई : १३ जून २०२४ गोदरेज ॲण्ड बॉयसचे व्यवसायिक युनिट असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने पुण्यातील पिरंगुट येथे रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पाचा विस्तार केला आहे. गोदरेज अँड बॉयसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांच्या हस्ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर ॲनेक्सीचे उद्घाटन करण्यात आले. ब्रँडच्या इनहाऊस डेव्हलपमेंटल आणि टेस्टिंग लॅबच्या सध्याच्या क्षमता दुप्पट करणे हे या धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट आहे. यामुळे कंपनीची कल्पना, गुणवत्ता आणि तांत्रिक प्रगती होईल. 

४३.००० चौरस फूट अतिरिक्त नवीन क्षेत्रासह विस्तारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे ब्रँडला त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागातील मनुष्यबळाची क्षमता दुप्पट करता येईल. यासह NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि प्रगत अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकास प्रक्रिया सक्षम करतात. हा विस्तार म्हणजे ग्राहकांना अत्याधुनिक आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादने वितरीत करण्याच्या गोदरेजच्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग आहे. इमारतीची स्वतःची रचनादेखील वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. विजेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या उद्देशाने येथे नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. एकत्रित काम करता यावे, एकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करता यावे अशा रितीने कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. ओपन ऑफिस डिझाइन आणि पारदर्शकता असलेला हा प्रकल्प आहे. 

यावर भाष्य करताना, गोदरेज आणि बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की, “गोदरेज अप्लायन्सेसमध्ये, उत्पादन विकास हा आमच्या ब्रँडचा कणा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे, आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली असून, ती आमच्या आमच्या यशासाठी मोलाची आहे, असे आम्हाला वाटते.  

या सुधारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे पिरंगुटमध्ये आमचा एकत्रित रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरील गुंतवणूक खर्च १०० कोटी रु.च्या जवळपास पोहोचला आहे. आमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने वितरीत करण्यासाठी आमचे समर्पण यातून दिसून येते. या विस्तारासह, आम्ही आमच्या उत्पादन विकासाच्या कालमर्यादेला गती देण्यासाठी आणि आगामी काळात बाजारात अधिक प्रगत उपकरणे सादर करण्यास तयार आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!