Homeक्राईमनाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) १७ वर्षीय विद्यार्थी पियुष प्रताप गायकवाड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पियुष गायकवाड आणि त्याचा मित्र हे दोघे चांदोरी येथून निफाडकडे मोटरसायकल (क्रमांक एमएच १५ केएफ १७८९) वरून येत होते. पिंपळसजवळ समोरून येणाऱ्या नेक्सन कार (क्रमांक एमएच १५ एसी ८५०९) आणि त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारासाठी नेत असताना पियुष गायकवाड याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मृत पियुष हा निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आयटीआय परिसरात तसेच पिंपळस व निफाड भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!