Times of Maharashtra Desk,”Cash drama in Malvan : शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांचे स्टिंग ऑपरेशन सध्या चांगलेच चर्चेत आहे. आमदार निलेश राणेयांनी काल 26 नोव्हेंबररोजी अचानक मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली होती. यावेळी नीलेश राणे यांना विजय किनवडेकर यांच्या घरात अवैध मोठी रोख रक्कम सापडली. ही रक्कम जवळ जवळ 25 लाख इतकी आहे. याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेयर केला आहे. विजय किनवडेकर यांच्या घरात एक हिरव्या रंगाची पिशवीत त्यांना ही रक्कम संपडल्याचे व्हीडिओत स्पष्ट दिसते.
या प्रकरणी रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत असे म्हणत त्यांनी विजय किनवडेकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तर भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार आहे असे म्हणत विरोधकांवर निशाण साधला आहे. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशन नंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले असून या वर आता बीजेपीने प्रत्युत्तर दिले आहे.
जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है, – नितीश राणे.
निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशन नंतर सिंधुदुर्गात राणे बंधूंची जुगलबंधी पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मैं सब नंगे है अस म्हणत त्यांनी नीलेश राणेंवर निशाण साधला आहे . त्यामुळे हा वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे.






















