शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :
शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील स्व.आण्णासो. साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालयास नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या आमदार निधीतून प्रोजेक्टर भेट देण्यात आले.या प्रोजेक्टर पासून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास क्रमात झालेले बदल विविध उपक्रम राबविण्यासाठी या प्रोजेक्टरचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
आमदार किशोर दराडे यांच्यातर्फे प्रोजेक्टर भेट देतेवेळी तालुका समन्वयक संतोष आव्हाड व इंजिनिअरींग कॉलेज नंदुरबार एचओडी विकास बोरसे, अनिल गायकवाड, तऱ्हाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, तापी परीसर विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष सुभाष भामरे, संचालिका उज्वला भामरे, संचालक प्रशांत भामरे उपस्थित होते.






















