Homeमहत्त्वाचेवाहेगावची कन्या श्रद्धा श्रीखंडे पोलीस कॉन्स्टेबल; गावाचा अभिमान, मुलींसाठी प्रेरणादायी यश

वाहेगावची कन्या श्रद्धा श्रीखंडे पोलीस कॉन्स्टेबल; गावाचा अभिमान, मुलींसाठी प्रेरणादायी यश

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव या छोट्याशा गावाने एक मोठा मानाचा क्षण अनुभवला आहे. येथील श्रद्धा संदीप श्रीखंडे हिने पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड होऊन गावाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. वाहेगाव गावातील पहिली महिला पोलीस कॉन्स्टेबल होण्याचा मान श्रद्धा हिने मिळवला असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

श्रद्धा श्रीखंडे हिची यवतमाळ जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून आलेल्या श्रद्धाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

श्रद्धाचे वडील संदीप लक्ष्मण श्रीखंडे हे शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलगा-मुलगी असा कोणताही भेदभाव न करता सर्व मुलांना समान शिक्षण दिले. कुटुंबात तीन मुली आणि एक मुलगा असून, सर्व मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या या सकारात्मक विचारसरणीमुळेच आज श्रद्धा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीतही श्रद्धाने हार न मानता दिवस-रात्र मेहनत घेतली. अभ्यासासोबतच शारीरिक तयारी करून तिने पोलीस भरतीची कठीण परीक्षा यशस्वीरीत्या पार केली. तिच्या या यशामुळे ती केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.

श्रद्धाच्या यशानंतर वाहेगाव गावातील  सरपंच बळवंत पळसकर माजी सरपंच कमलाकर श्रीखंडे प्रवीण श्रीखंडे व रतन श्रीखंडे व तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते या महिला कॉन्स्टेबलचा सत्कार केला तिचा जंगी सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

श्रद्धा श्रीखंडे हिचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास इतर ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” हा संदेश तिच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो.

वाहेगाव गावासाठी हा ऐतिहासिक क्षण असून, भविष्यातही अशाच प्रकारे गावातील मुली विविध क्षेत्रात प्रगती करून गावाचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!