शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) येथील आमदार कार्यालयात ‘SIR’ (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा आणि जिल्हाध्यक्ष श्री. बापू खलाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत शिरपूर विधानसभा मतदार संघातील बूथ निहाय SIR बाबत चर्चा करण्यात आली. एकूण मतदारांचे फार्म वाटप व त्यातील पूर्ण फार्म भरून अपलोड किती झाले याची टक्केवारी काढण्यात आली. तसेच 29/07/2026 पर्यत तालुक्यातील सर्व मतदारांचे फार्म अपलोड करून घेण्याबाबत जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
या बैठकीत आमदार काशिराम पावरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई यांच्या मार्गदर्शनाने व नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या सहकार्याने शिरपूर तालुक्याने मिळवलेल्या डिजिटल प्रशिक्षणातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण’ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातील सर्वाधिक ४,३३६ नागरिकांनी यशस्वीरीत्या डिजिटल प्रशिक्षण पूर्ण केले असून आपले सर्टिफिकेट देखील डाउनलोड केले आहे. शिरपूर तालुक्याचा हा टप्पा संपूर्ण जिल्ह्यात अव्वल ठरल्याबद्दल आमदार श्री. काशिराम पावरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

”शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी आणि तरुणांनी डिजिटल प्रशिक्षणाला दिलेला हा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपला तालुका आघाडीवर राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— श्री. काशिराम पावरा, आमदार
या आढावा बैठकीला विधानसभा प्रमुख के डी पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बागल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत, मा जि प सदस्य संजय पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरेंद्र राजपूत, ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, नगरसेवक राज सिसोदिया, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, मा पं स सदस्य यतिश सोनवणे, भाजपा सोशल मीडियाचे अजित राजपूत तसेच तालुक्यातू पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी सर्व मंडळ अध्यक्षांनी परिश्रम घेतले.






















