Homeटेक्नॉलॉजीदौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी परंपरेचा गौरव

दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व आनंदमय वातावरणात दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित वारकरी बांधवांना मार्गदर्शन करताना नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी वारीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली पदयात्रा म्हणजे वारी होय. ‘पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन’ या ध्यासाने लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांमुळे वारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वारी ही समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा असून, येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव नसतो. सर्व वारकरी एकाच भक्तिभावाने “राम कृष्ण हरी”चा अखंड गजर करत पुढे जातात. वारीमधील शिस्त, नियोजन, दिंड्यांची व्यवस्था, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक सोहळे हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पायी वारीमुळे मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि शारीरिक सुदृढता लाभत असून, वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जिवंत परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कै. शिवाजी महादू पाचंगे हे या दिंडीचे संस्थापक असून, यंदा दिंडीचे १३ वे वर्ष आहे. खंडोबा देवाची ही दिंडी सुमारे २०० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे … यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांसाठी स्वादिष्ट नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी श्री चंद्रकांत मलगुंडे, रामदास पाचंगे, माजी सरपंच पंढरीनाथ मलगुंडे, राजाराम पाचंगे, सुरेश पाचंगे, बन्सी पाचंगे, म्हस्कु मलगुंडे, कैलास पाचंगे, जयसिंग मलगुंडे, बापुराव मलगुंडे, शांताराम पाचंगे, संजय श्रीराम, शिवाजी मलगुंडे, विलास शिंदे व पुजारी शरद गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

दत्त पीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी सर्व वारकरी बांधवांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त बुवा सावंत तसेच ज्येष्ठ विधीतज्ञ श्री विलास बर्वे उपस्थित होते. स्वागत समारंभानंतर जयघोष आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

error: Content is protected !!