Homeताज्या बातम्या०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६ चा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्र निहाय मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक २०/०६/२०२६ पासुन कार्यक्रम सुरू झालेला आहे, विशेष सखोल पुनरीक्षणासाठी अर्हता दिनांक ०१/१०/२०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

​ पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे (SIR-2026):

​पहिला टप्पा (दि. २०/०६/२०२६ ते २९/०६/२०२६): पूर्व तयारी प्रशिक्षण व मतदाराचे EF छपाई करण्यात आली आहे

​दुसरा टप्पा (दि. ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६): या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून घरोघरी भेट देऊन Enumeration Form गणना पत्रक वाटप करणे व मतदारांकडून भरून घेणे.

​तिसरा टप्पा (दि. २९/०७/२०२६): मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करणे.

​चौथा टप्पा (दि. ०५/०८/२०२६): प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे.

​पाचवा टप्पा (दि. ०५/०८/२०२६ ते ०४/०९/२०२६): दावे आणि हरकती दाखल करणे.

​सहावा टप्पा (दि. ०५/०८/२०२६ ते ०३/१०/२०२६): प्राप्त दावे व हरकती यावर सुनावणी घेणे.

​अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी दिनांक: ०७/१०/२०२६

​०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघ सर्वसाधारण माहिती:
​एकूण मतदान केंद्र संख्या :- ३३६
​मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संख्या :- ३३६
​BLO-पर्यवेक्षक संख्या :- ३४
​एकूण मतदार संख्या :- ३,५१,१८६
​सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्ती संख्या :- ०९

मतदारांना ​महत्त्वाचे आवाहन:

​मतदार यादीचे पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ३३६ व पर्यवेक्षक ३४ यांचे प्रशिक्षण एस.एम.पटेल हॉल करवंद नाका शिरपूर येथे दोन सत्रांत आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपूर श्री शरद मंडलिक तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी तसेच मास्टर ट्रेनर श्री दिपक पाटील (उप शिक्षक जि. प. शाळा मांजरोद) यांनी दिले.

​दिनांक ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत
BLO आपल्याकडे निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म घेऊन येतील.
त्या फॉर्म वर माहिती भरली जाईल व तुमचे पासपोर्ट साईझ फोटो चिटकवले जातील. (त्यासाठी सर्व मतदारांनी पासपोर्ट साईझ फोटो आजच काढून ठेवा).
त्या फॉर्म वर मतदारांना स्वतः सही /अंगठा करायचा आहे.
एक फॉर्म स्वतः कडे ठेवायचा आणि दुसरा फॉर्म BLO यांच्याकडे द्यायचा आहे.!
या फॉर्म मध्ये ४० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना त्यांचे २००२ च्या यादीत अनुक्रमांक आणि भाग क्रमांक सांगायचा आहे.
४० पेक्षा कमी वय असणाऱ्या मतदारांनी त्यांचे आई, वडील, आजी, आजोबा यापैकी कोणत्याही एकाचे २००२ चया मतदार यादीतील क्रमांक सांगायचा आहे.
विवाहित महिलांची त्यांच्या माहेरची (आई, वडील, आज्जी, आजोबा यांची माहिती द्याायची आहे.
जे मतदार फॉर्म भरून देणार नाहीत त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत येणार नाहीत.
असे आवाहन शिरपूर तालुक्यातील सर्व मतदारांना शरद मंडलिक मतदार नोंदणी अधिकारी तसेच महेंद्र माळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

error: Content is protected !!