Homeताज्या बातम्याशिवशाही बसचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली...

शिवशाही बसचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली…

अकोला :- अमरातीकडून येणारी शिवशाही बस वेगाने अकोश वाटीका चौकात येते व थेट पेट्रोल पंपाच्या भींतीवर जाऊन धडकते. घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडतो व घटनास्थळी एकच खळबळ उडते. ही थरारक घटना अकोला शहरातील अशोक वाटीका चौकात गुरुवारी (१९ डिसेंबर) दुपारी चार वाजताचे सुमारास घडली.

अमरावती-अकोला शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्न्ल्यू ४३१६) अमरावती येथून काही प्रवासी घेऊन अकोल्यात पोहोचली. बोरगाव मंजू व शिवणी येथे बसमधील प्रवासी उतरल्यानंतर रिकामी बस अकोला मध्यवर्ती बसस्थानकाकडे येत असताना नेहरु चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक मनोज तायडे यांच्या लक्षात आले. त्यांनी गिअरद्वारे वेगावर नियंत्रण मिळवत अशोक वाटीका चौकापर्यंत आणली. या ठिकाणी रेड सिग्नल असल्यामुळे अनेक वाहने थांबलेली असल्याचे पाहताच चालकाने प्रसंगावधान दाखवत आपली बस पेट्रोल पंपाच्या दिशेने घेत आवारभींतीवर धडकवली. त्यामुळे बस जागीच थांबली व पुढील अनर्थ टळला.

ब्रेक निकामी झालेली शिवशाही बस नेहरु पार्क चौकातून अशोक वाटीका चौकात आली तेव्हा उड्डाणपुलाखालील सिग्नल लाल होता. वर्दळीच्या असलेल्या या चौकात अनेक वाहने सिग्नल हिरवा होण्याच्या प्रतीक्षेत थांबलेली होती. शिवशाही बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून बस पेट्रोल पंपाच्या भींतीवर धडकवली नसती तर ती सरळ चौकात जाऊन तेथे उभ्या असलेल्या वाहनचालकांना चिरडत पुढे गेली असती.

बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पॅडल ब्रेक आतमध्ये गेल्याचे दिसले. बस थांबविण्यासाठी मी गीअर कंट्रोल करत वेग कमी केला व पेट्रेाल पंपाच्या भींतीवर बस नेली. तसे केले नसते तर चौकात उभे असलेले अनेक जण चिरडले गेले असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!