Homeताज्या बातम्याउद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका

उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका

देवगड : गद्दारी करून चिन्ह, पक्ष, नाव चोरलात, हे करून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलात? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केलात, अशी बोचरी टीका देवगड येथील जाहीर प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड सारस्वत बँकेसमोरील पटांगणात आयोजित प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, उद्धवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी वडील उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसतानाही, त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. अशा परिस्थितीत गद्दारी करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचे काम केले. आज मुंबईचे अस्तित्व कोकणी माणसामुळे टिकून आहे. बाळासाहेबांपासून कोकण आणि शिवसेना असे अतूट नाते आहे. परिवर्तन आवश्यक आहे. परिवर्तनासाठी तुम्हाला मशाल पेटवावी लागेल, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
यावेळी स्वप्निल धुरी, किरण टेंबुलकर, विवेक ताम्हणकर, ॲड.प्रसाद करंदीकर यांनी विचार मांडले. सभेपूर्वी जामसंडे ते देवगड अशी बाइक रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले. या सभेनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आचरा, कुडाळ तालुक्यातील माणगाव आणि वेंगुर्ला येथेही प्रचार सभा झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक...

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा...

एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी...

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी...

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे...

error: Content is protected !!