Homeताज्या बातम्याराज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयानुसार संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, पुणे यांच्या मार्फत २२ मे २०२६ रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.

परिपत्रकानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना यांच्या एकत्रित लाभातून नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिल्या जात आहेत. राज्यातील लाखो नागरिक या योजनेचा लाभ घेत असून आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी आपले ABHA कार्ड तयार करून त्याची नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कार्यपद्धती व व्हिडिओ लिंक देखील संबंधित कार्यालयांना पाठविण्यात आली आहे.

तसेच, ज्या कर्मचाऱ्यांचे ABHA कार्ड तयार होणार नाही, त्यांची ५ लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय सुविधेची नोंद विचारात घेतली जाणार नसल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण...

error: Content is protected !!