Homeताज्या बातम्याबकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दि. 28 मे 2026 रोजी देशभरात बकरी ईद साजरी होणार असून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून शेळीपालन व बोकड पालन करतात. वर्षातून एकदाच हे शेतकरी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोकड विक्रीसाठी आणतात. मात्र, पोलीस व आरटीओ प्रशासनाकडून अशा वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करून वाहने जप्त केली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरटीओ प्रशासनाकडून जनावरे वाहतुकीसाठी विशेष परवान्याची अट घालण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ आठवडाभराच्या वाहतुकीसाठी संपूर्ण वर्षाचा परवाना काढणे गरीब शेतकऱ्यांना शक्य नसल्याचे मुलाणी यांनी नमूद केले. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर नाममात्र ₹1000 दंड आकारून ती तात्काळ सोडावीत, तसेच ग्राहकांच्या वाहनांवर ₹300 दंड आकारून कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी शाहरुख मुलाणी म्हणाले, “शासन एकीकडे शेळीपालनासाठी अनुदान देते, तर दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली त्रास दिला जात आहे. गरीब शेतकरी वर्षभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. बकरी ईद निमित्त मुंबई व इतर मेट्रो शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जाणारे बोकड हे राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमधील गोरगरीब शेतकऱ्यांचे असतात. या व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह, शेतीचा खर्च आणि संसार अवलंबून असतो.”

पोलीस व आरटीओ प्रशासनाने मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करावी, अन्यथा समाजातील वाढत्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर निवेदनाची प्रत परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, विविध शेतकरी संघटना, हिंदू खाटीक समाज संघटना तसेच बोकड व्यापारी संघटनांना पाठविण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या :बकरी ईद निमित्त बोकड वाहतूक करणाऱ्या शेतकरी व ग्राहकांच्या वाहनांवरील कारवाई तात्काळ थांबवावी.

जप्त करण्यात आलेली शेतकऱ्यांची वाहने प्रती वाहन ₹1000 दंड आकारून तात्काळ सोडावीत.
ग्राहकांच्या वाहनांवर केवळ ₹300 नाममात्र दंड आकारून ती वाहने मुक्त करावीत.
पोलीस व आरटीओ प्रशासनाला मानवीय दृष्टीकोन ठेवून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोकडांची तपासणी करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

“शेतकऱ्यांनी व्यापार करायचा नाही तर कोणी करायचा?”; मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!