पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव नगर, वडगाव बुद्रुक, पुणे यांची एमएच-12-एनक्यू-8199 क्रमांकाची अॅक्टिव्हा दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. तसेच विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून चोरीस गेलेली दुचाकी शोधून काढण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भापकर, पोलीस हवालदार महिबुब नदाफ, पोलीस हवालदार जेधे, पोलीस अंमलदार बालाजी शिंदे, पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव आणि पोलीस हवालदार राजेश थोरात यांच्या पथकाने केली.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जप्त करण्यात आलेली अॅक्टिव्हा दुचाकी मूळ मालकिणीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






















