Homeताज्या बातम्याफराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीत भाविकांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष साहेबराव झुंबके, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, शिवचरण पांढरे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चौधरी, अग्निशमन अधिकारी अनिल देशमुख, आरोग्य अधिकारी परमेश्वर वाकोडे, स्वाती पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत भाविकांच्या जीविताची आणि आरोग्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडण्याचे आदेश दिले. दर्शन रांगा, वाहतूक, स्वच्छता, आपत्कालीन यंत्रणा, अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भाविकांना फराळ वाटप करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) चा वैध परवाना असणे बंधनकारक राहील. परवान्याशिवाय कोणालाही फराळ वाटप करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण, अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा, वॉच टॉवर, ग्रीन कॉरिडॉर, आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यात्रेदरम्यान प्रत्येक कर्मचारी दक्षतेने काम करून विठ्ठल भक्तांना सुरक्षित, सुखकर आणि अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव मिळावा, असे आवाहनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!