Homeताज्या बातम्यासातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६ पासूनचा फरक अदा करण्यात यावा, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बाबासाहेब गावडे यांनी ही मागणी केली असून, राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा महत्त्वाचा विषय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, पोलीस कर्मचारी वर्षभर कायदा व सुव्यवस्था, निवडणुका, व्हीआयपी बंदोबस्त, सण-उत्सव, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर तातडीच्या सेवांमध्ये सातत्याने कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित सुट्ट्यांचा लाभ मिळत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात अर्जित रजा शिल्लक राहते. मात्र, या रजेचे रोखीकरण अद्यापही सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शासनाने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६ पासूनचा वेतन फरक देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण आणि कठीण सेवा परिस्थिती लक्षात घेता शासनाने या मागणीवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

error: Content is protected !!