Homeताज्या बातम्या'सुशी'वडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस

‘सुशी’वडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस

संभाजी मुळक याची मुंबई पोलीसपदी निवड ; ग्रामस्थांकडून सत्कार

विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सुशी (व) येथील भूमिपुत्र संभाजी शिवाजी मुळक याची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. विशेष म्हणजे तो गावातील पहिला पोलीस म्हणून पोलीस दलात भरती झाला आहे. तर शेतकऱ्याचा मुलगा पोलीस झाल्याने सुशी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा भव्य नागरी सत्कार करुन गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. एका ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या कष्टाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी कुटुंबातील संभाजी शिवाजी मुळक याने यापूर्वी आर्मी , वनरक्षक, पोलीस भरती यांसह विविध खात्यात भरतीसाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर त्याने यशाला गवसणी घातली आहे. ना कोणत्या अकॅडमीत ना कुठले क्लास त्याने केले होते. फक्त मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुशी ग्रामस्थांच्या वतीने त्याची गावातून भव्य मिरवणूक काढली. यावेळी महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करुन गावातील मुख्य चौकातून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी होवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे
लहानपणापासून मनात एकच स्वप्न होते की सर्वसामान्याची सेवा करण्यासाठी आपल्याला मोठा अधिकारी व्हायचं आहे. आई-वडील आणि शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाने पोलीस दलात भरती झालो आहे. एवढ्यावरच न थांबता पोलीस खात्यातून सर्वसामान्याची सेवा करत भविष्यात पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी होवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे.
– संभाजी शिवाजी मुळक (पोलीस)

महागड्या क्लासेसशिवाय जिद्दीने परिश्रमातून मिळवले यश; तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत
महागडे क्लासेस किंवा अभ्यासिकेंशिवाय केवळ स्वयंभू जिद्द आणि परिश्रमातून पोलीस बनणे हे प्रेरणादायी आहे. हा प्रवास कठोर मेहनत, नियोजनात्मक अभ्यास आणि सातत्यपूर्ण मैदानी सरावाचा उत्तम मेळ असतो. संभाजी शिवाजी मुळक याने प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असतानाही जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले. त्यांच्या या निवडीबद्दल गावातील इतर तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत बनला आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!